उदगीर व जळकोट जल जीवन अभियान स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाची आढावा बैठक

 

उदगीर व जळकोट जल जीवन अभियान स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाची आढावा बैठक

नवीन योजनासंदर्भातील सुधारीत आराखडा प्राधान्याने तयार करावा

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे




मुंबई
, दि. 21: जल जीवन मिशन अंतर्गत नवीन प्रस्तावित योजनासंदर्भातील सर्व अंदाजपत्रक प्राधान्याने ऑक्टोबर 2021 अखेर तयार कररण्यात यावा अशासूचना  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील जल जीवन अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कामांचा तसेच नागरी पाणीपुरवठा योजनांबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला आमदार बाबासाहेब पाटील

, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जल जीवन अभियनाचे संचालक, ऋषिकेश यशोद , लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव गोयल औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. बनसोडे म्हणाले की, नवीन योजना आणि रेट्रोफिटींग योजनासंदर्भात अंदाज पत्रक तयार करीत असताना या योजना लवकरात लवकर कार्यान्वित कशा होतील याबाबत नियोजन करण्यात यावे.तसेच नवीन योजना कार्यान्वित करताना त्या लवकरात लवकर कशा सुरु होतील हे पाहणे आवश्यक असल्याने याबाबत पुढील बैठक लवकरच औरंगाबाद येथे घेण्यात येईल.

वांजरवाडा हे लातूर जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने त्या गावासाठी जलजीवन अभियान मधून प्राधान्याने योजना आखण्यात यावी असेही आदेश मा. राज्यमंत्री महोदयांनी दिले.

 तसेच आता जे जे एम डायरेक्टर ऑफिस येथे सादर असलेल्या लोणी  हळळी तोंडार  या योजना तातडीने बैठक विशेष बैठक घेऊन शासनाकडे सादर करणे बाबत निर्देश दिले.

 तसेच मादलपूर व हेर गावांच्या योजना तातडीने 10 दिवसात सादर करण्याबाबत सूचना दिल्या

 उदगीर जळकोट तालुक्यासाठी जे जे एम डायरेक्टर सी इ ओ लातूर यांनी सरव संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर वेगळी बैठक घेऊन गतीने काम होणे बाबत नियोजन करावे यावेळी लातूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन कामाचे सविस्तर आढावा सादर केला व जे जे एम योजनेबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असलेले सांगितले यासोबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट करण्यात येत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले

 शहरी भागाच्या पाणीपुरवठा मलनिस्सारण योजनांचा आढावा घेताना मंत्रीमहोदयांनी खालील निर्देश दिले 1. उदगीर पाणीपुरवठा योजना 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत चाचणी स्वरूपात चालू करावी

2. मलनिस्सारण योजनेस आवश्यक जागा मुख्याधिकारी उदगीर यांनी तातडीने उपलब्ध करून घ्यावीत

3. जळकोट नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजनेची आखणी मुख्य अभियंता यांनी पाहणी करून       

    कार्यवाही करावी

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु