ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांनी

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

लातूर,दि.20,(जिमाका):-राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व  लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये फार्म सेव्हड् सिड वृध्दीगत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांतर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषि विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारअसुन जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 4300 क्वि. व गहु पिकासाठी 350 क्वि. चे लक्षांक प्राप्त आहे.

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी 01 एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार असून हरभरा पिकासाठी10 वर्षाच्या आतिल (जात- फुले विक्रम, राजविजय-202, AKG-1109, फुले विक्रम) बियाण्यासाठी रू. 25/- प्रति किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-जॅकी-9218,दीग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी रू. 12/- प्रति किलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकासाठी 10 वर्षाच्या आतिल (जात- फुले समाधान, NPAW-1415) बियाण्यासाठी रू. 20/- प्रति किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-MACs-6222,HI-1544,GW-496, लोकवन)बियाण्यासाठी रू. 10/- प्रति किलो अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आनिवार्य आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजीकच्या सामुहीक सेवा केंद्रे, ठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतकऱ्यांकडे android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्लेस्टोअरवर जाऊन MahaDBT Farmer हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे. या सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सदर ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरीअर्ज करू शकतील. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेबर 2021 आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेत जिल्ह्यातील गांवातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक  माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे अवाहन दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 

                                                           ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा