जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने 47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने

47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले


लातूर दि.28 ( जि.मा.का ):- पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आणि पृथ्यीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिमने सकाळपासून सारसा या गावातील पुरात अडकलेल्या 47 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.


मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यातून अनेकांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टिमने नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही केली सकाळी 11-30 ते सांयकाळी 5-30 वेळेपर्यंत ही कार्यवाही सुरु होती.

पूरपरिस्थितीतून आज सारसा ता. रेणापूर येथील 47 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात आले .

  या कार्यवाहीत उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, नायब तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, मंडळ अधिकारी श्रीमती अकोले , तलाठी मादळे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री. ढोणे तसेच सारसा येथील ग्रामसेवक आदींचा सहभाग होता.

0000






 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु