जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन
*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत*
*क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन*
लातूर दि.29 (जिमाका):- क्रीडा क्षेत्रात
खेळाडूंनी कामगीरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे
आवश्यक आहे. क्रीडा व सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट इन्स्ट्यूट यांच्या संयूक्त विद्यमाने स्पोर्टस कंपनी, पुणे
येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या चाचण्यात वय वर्षे 8 ते 14 वर्षाखालील मुले
सहभाग घेऊ शकतात दि.1
जानेवारी 2022 रोजी वय वर्षे 8 ते 14 असणे आवश्यक राहील. यात डायव्हिंग या प्रकारासाठी 8 ते 12 वयोगट राहील व
ॲथलेटीक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टिंग यासाठी वयोगट 10 ते 14 वर्षे
राहील.
या चाचण्याचे आयोजन
दि.4 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकूल,लातूर येथे सकाळी ठीक
11-00 वाजेपासून घेण्यात येईल. विविध खेळ प्रकारासाठी वेगवेगळया शारिरीक चाचण्या
रनिंग, व्हर्टीकल जम्प, कॅनेडिअन बीफ टेस्ट, पुशअप्स, हायपर एक्सटेंशन, सीट अप मॅक्स
व इतर अनेक संबंधित टेस्ट घेऊन पात्र खेळाडूंना विभाग व राज्यस्तरावर पाठविण्यात
येईल.
जिल्हयातील सर्व
संबंधितानी याची नोद घेवून जिल्हस्तरीय चाचण्यासाठी खेळाडूंच्या ओळखपत्रासह जिल्हा
क्रीडा संकूल,लातूर येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी
केले आहे.
****
Comments
Post a Comment