मांजरा, तेरणा नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे, आपत्तकालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास सपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

मांजरा, तेरणा नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे, आपत्तकालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास सपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

       

लातूर,दि.28 (जिमाका):-मागील काही दिवसात होत असलेल्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले असून दोन्ही धरणात अजून पाण्याची आवक सूरू असल्याने धरणातरील अतिरिक्त पाणी नदीद्वारे तसेच कालव्यातूमन (आरओएस प्रमाणे) सोडण्यात येत आहे. त्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येवून मांजरा आणि तेरणा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावकऱ्यांनी  सतर्क राहून आपत्तकालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती वयवस्थापक प्राधिकरण चे अध्यक्ष पृथवीराज बी.पी. यांनी केले आहे.

पुढील दोन-तीन दिवसात मोठया पावसाची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व गावांनी सर्तक राहावे.संभाव्य पूरपरिस्थिती व वीज पडण्याची शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी पूढील प्रमाणे काळजी घ्यावी:-

     मुसळधार पाऊस सुरू असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुरच्या पाण्यात जावू नये. जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने कोणीही जलसाठे पाहण्यासाठी/पर्यटनासाठी जाऊ नये.नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकंनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.आपल्या गरजेच्या वस्तू(औषधी,रोख रक्कम) स्वत:जवळ बाळगावी.नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

या कालावधीत विज पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हयातील सर्व शेतकरी/नागरिाकांनी खबरदरी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असताना घरा-बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3-00 ते 7-00 यावेळेत शेतीची व इतर कामे करू नये कारण या कालावधीत विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली/पाण्याच्या स्त्रोताजवळ /विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत:सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ /नदीजवर पाठवू नये आपल्या मुलांना जलसाठ्यावर/नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये,शाळा महाविद्यालायातील शिक्षकांनी आपल्या विद्याथर्यांना सूचित करावे.पुलावरून/नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल/नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूल प्रवर्ण क्षेत्रात कोणीही जाऊ नये.पाऊस सुरू असताना विजेच्या तारा /जुन्या ईमारती कोसळण्याची शक्यता असते.तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.

स्थानिक पोलीस अधिकारी/ तलाठी/ मंडळ अधिकारी/ ग्रामसेवक/ सरपंच/ कृषि सहायक/ शहरी भागात म.न.पा /न.प.यांचे अधिकारी यांच्याशी संपर्कात राहन ते देत असलेल्या सूचनांचे पालक करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावकऱ्यांना सावधगीरीची सूचना देवून  योग्य ती उपयायोजनाकरावी. आपत्तकालिन परिस्थितीत तालुका प्रशासनास पुढील दिलेल्य क्रमांकावर संपर्क साधवा.

लातूर नायब तहसिलदार राजेश जाधव मो.नं 9623 889500, अव्वल कारकून गणेश येडके मो.नं. 9422182756,औसा नायब तहसिलदार दत्ता कांबळे मो.नं.9423075656 , रेणापूर नायब तहसिदार सुभाष कानडे मो.नं. 9860686286 ,निलंगा नायब तहसदिार श्री.आडसूळ मो.नं. 8888871037,अव्वल कारकून एस.टी.नाईक मो.नं.9834039674,देवणी नायब तहसिदार श्रीमती माडजे मो.नं. 8805583307,शिरूर अनंतपाळ नायब तहसिदार सुधिर बिराजदार मो.नं. 9834599218 उदगीर नायब तहसिदार श्री.धुमाळ  मो.नं.9765898414, जळकोट नायब तहसिदार श्री.शेख मो.नं. 9660686286, अहमदपूर नायब तहसिदार श्री.दाताळे मो.नं.7262976888 व चाकूर नायब तहसिदार टिप्परसे एस.एस. मो.नं.9822506279 असे आहेत.

                                         ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा