लातूर जिल्ह्यात 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण मोहिम
लातूर जिल्ह्यात 27 ते 30 सप्टेंबर
या कालावधीत
संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण मोहिम
लातूर दि.27 ( जिमाका ):- जिल्ह्यात
सोमवार, दिनांक 27 सप्टेंबर, 2021 पासून Community TAS (संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण)
राबविण्यात येणार आहे. सन 2004 पासून राज्यातील एकूण 18 जिल्ह्यामध्ये सामुदायिक औषधोपचार
मोहिम (MDA)राबविण्यात येत
होती. सन -2030 पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे हे आपले राष्ट्रीय
उद्दिष्ट असून त्यासाठी राज्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (MDA) सुरु करण्यात आली आहे.
ज्या
जिल्हयात मागील तीन वर्षापासून एम एफ दर सातत्याने व सर्व ठिकाणी एक टक्क्यापेक्षा
कमी आढळला आहे, अशा जिल्ह्यातील सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (MDA) बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या
मार्गदर्शनानुसार घेण्यात आला आहे. मात्र, ही मोहिम बंद करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यात
अतिरिक्त एम एफ सर्व्हेक्षण करुन निवड करण्यात आलेल्या सर्व (Random Spot) रॅन्डम स्पॉटमध्ये हत्तीरोग रक्त दुषितांचे
प्रमाण एक टक्कयापेक्षा कमी आल्याची खातरजमा करण्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये
Community TAS (संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण) हे विशेष सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार
सध्या राज्यातील सहा जिल्हयापैकी लातूर जिल्हयात सामुदायिक औषधोपचार मोहिम (MDA) बंद करण्यात
आली असून हे जिल्हे हत्तीरोग दुरीकरणाच्या अंतिम टप्पयात आहेत. ही मोहिमेतंर्गत ६ ते
७ वर्ष वयोगटातील ( इयत्ता पहिली व इय्यता दुसरी) विद्यार्थ्यांची घरोघरी जाऊन त्यांना
शाळेमध्ये बोलावून एफटीएस किट्समार्फत एकूण 16 टिमच्या मदतीने दिनांक 27 ते 30 सप्टेंबर,
2021 या कालावधीत रक्त नमुना तपासणी करण्यात येणार आहे.
या अगोदर
सन 2017 आणि 2019 मध्ये ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आलेली होती. त्यामध्ये लातूर
जिल्हा पास झालेला होता, आता या मोहिमेत लातूर जिल्हा पास झाला, तर सामुदायिक औषधोपचार
मोहिम (DMA) मधून जिल्हा
बाहेर पडेल आणि (DMA) मोहिम पुर्ण
पणे बंद करण्यात येईल. तसेच लातूर जिल्हा हा हत्तीरोग संक्रमण मुक्त म्हणून जाहीर करण्यात
येईल.
या मोहिमेसाठी
एकूण 16 टिमची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य
अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा व शिक्षक
यांचा समावेश आहे.या कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दि. 23 सप्टेंबर
2021 रोजी देण्यात आले आहे. जिल्हयात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 23 सप्टेंबर
2021 रोजी जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व
तयारीचा आढावा घेण्यात आला. या मोहिमे अंतर्गत जिल्हयातील निवडक 66 गाव / भागातील
(लातूर शहर वगळून) एकूण 4 हजार 61 विद्यार्थ्यांची रक्त नमुना तपासणी करण्यात येणार
आहे. त्यासाठी जनतेने सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य सभापती,
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक संचालक (हिवताप) उपसंचालक,
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment