विमा संरक्षीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन
विमा संरक्षीत पिकांचे नुकसान झाल्यास
विमा कंपनीला कळवावे
-जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी यांचे आवाहन
लातूर,दि.22
(जिमाका):- जिल्हयामध्ये मागील
काही दिवसापासुन सर्वदुर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत तसेच काही पिकाची
काढणी सुरु आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी
अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्सखलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे
लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई
दिली जाते.
तसेच काढणीपश्चात नुकसान या जोखीमेअंतर्गत देखील
वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. फळपिक विमा धारक शेतकऱ्यांना
देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीकरीता वयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई
दिली जाते.
यासाठी शेतकऱ्यांनी ही घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत
नुकसानीची सुचना सर्व प्रथम प्राधान्याने (Crop Insurance) मोबाईल
ॲपव्दारे देण्यात यावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना व्यक्तीश अर्ज,कागदपत्रे दयावे लागणार
नाहीत व कार्यालया समोरील संभाव्य गर्दी होणार नाही.
या ॲपव्दारे
दिलेल्या अर्जाची पूष्टी करुन संबंधीत शेतकऱ्यांना मोबाईलव्दारे डॉकेट आय डी मिळेल.
ज्याव्दारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपव्दारेच पाहता येणार आहे.
मोबाईल ॲपव्दारे
शक्य न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक /
कृषि विभाग / महसूल विभाग यांना देण्यात यावी. सदरची माहिती बँक / संबंधीत विभागाकडून विमा कंपनीस तात्काळ
पूढील 48 तासात पाठविण्यात यईल.
(Crop
Insurance) मोबाईल ॲप (Google Play Store) वर उपलब्ध् असून मराठी भाषेमध्ये माहिती
भरता येणे शक्य असल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे यांनी प्राधान्याने ॲपव्दारे
नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी
संतोष भोसले, मो.क्र. 9370950044 व जिल्हा प्रतिनिधी एच.डी.एफ.सी. अर्गो जनरल इन्शुरंस
कंपनीचे अविनाश खेडकर मो.न.8888436054 यांच्याशी किंवा नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क
करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
Comments
Post a Comment