पोहरेगाव येथील मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले

 

पोहरेगाव येथील मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या

तिघांना आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले

 

        लातूर दि.29 (जि.मा.का) मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे ( वय 50 ), पत्नी रुक्माबाईं ( वय 45) आणि त्यांचा मुलगा

         चंद्रकांत (वय 11) यांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.    

         काल सायंकाळी हे हेलिकॉप्टर लातूर विमानतळात दाखल झाले होते. सदरील शोध व बचाव मोहीम पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कामगिरी भारतीय वायुसेनेचे पायलट श्री. प्रतीक बऱ्हाणंपुरे व त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवारून हेलिकॉप्टर सोबत  मार्गदर्शनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी   हे उपस्थित होते.

 

                                                                   

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु