अन्न व्यवसाईकांसाठी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरिता विशेष मोहिम

 

अन्न व्यवसाईकांसाठी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र

घेण्याकरिता विशेष मोहिम  

 

 लातूर दि.28-(जि.मा.का.) अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत अन्न व्यवसाईकांना परवाना / नोंदणी प्रमाणपत्र  घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात येत असल्याचे परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

दिनांक 5 ऑगस्ट 2011 पासुन संपूर्ण देशभरात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या कायद्याच्या कलम 31 नुसार व्यावसाईकांनी (जसे अन्न पदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंन्ट, हातगाडी अन्न विक्रेते, भाजी व फळे विक्रेते,ज्यूस सेंन्टर,चिकन ,मटन व अंडी विक्रेते, मिठाई विक्रेते,बेकरी इ.) त्यांचा व्यवसाय सुरु करण्यापुर्वी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.सदर कायदयानुसार विनापरवाना व्यवसाय करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असुन सदर गून्हयामध्ये सहा महिने शिक्षा व रुपये पाच लाखापर्यंत दंड होऊ शकतो.

अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसाईकांची परवाना व नोंदणी) नियम 2011 मध्ये नमुद असलेला परवाना अट क्रमांक 14 नुसार प्रत्येक अन्न पदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी केवळ परवाना घारक / नोंदणी धारक अन्न व्यवसाईकांकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करणे व परवाना / नोंदणी असलेल्याच अन्न व्यवसाईकांस अन्न पदार्थाची विक्री करणे बंधनकारक आहे. सदर परवाना अटीचे उल्लंघन केल्यास कलम 58 नुसार रुपये दोन लाख पर्यंत दंड होऊ शकतो.

अन्न व्यवसाईकांना परवाना / नोंदणी प्रमाणपत्र करीता केवळ ऑनलाईन पध्दतीनेच www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळाव्दारे अर्ज करता येतील त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व शुल्क बाबतची माहिती तसेच इतर तपशिल या संकेतस्थळावर उलब्ध्‍ आहे.

प्रशासना मार्फत जिल्हयातील सर्व अन्न व्यवसाईकांना अन्न सुरक्षा मानदे व कायदा 2006 अंतर्गत परवाना / नोंदणी तात्काळ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर कोणताही अन्न व्यवसाईक विना परवाना / नोंदणी व्यवसाय करतांना आढळून आल्यास त्यांचे विरुध्द कायदयाअंतर्गत्‍ तरतुदी नुसार कठोर कारवाई घेण्यात येईल तसेच अन्न पदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी विना परवाना / विना नोंदणी अन्न व्यवसाईकाकडुन अन्न पदार्थ खरेदी केल्याचे व विना परवाना / नोंदणी अन्न व्यवसाईकांस अन्न पदार्थ विक्री केल्याचे आढळुन आल्यास त्यांचे विरुध्द कठोर कारवाई घेण्यात येईल.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु