विज्ञान व गणिताच्या तीन हजार शिक्षकांसाठी

ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन

 

          लातूर,दि.20,(जिमाका):-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड जि.लातूर ,अगस्त्या इंटरनशनल फाउंडेशन,पुणे आणि शिक्षण विभाग जि.प.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५ वी ते १० वी उच्च प्राथमिक व माध्यमिक ला विज्ञान व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी व गणित,विज्ञान या महत्वाच्या विषयामध्ये मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला कृतीची जोड मिळून अभ्यासात गोडी निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील गुगल लिंक द्वारे प्रशिक्षणाची मागणी नोंदवलेल्या शिक्षकांचे दोन दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

          या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून 3000 शिक्षकांनी ऑनलाईन मागणी नोंदविलेली आहे मागणी नोंदविलेल्या शिक्षकांच्या 500 प्रमाणे सहा बॅचेस करण्यात आल्या असून प्रत्येक बॅचला दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे २१ सप्टेंबर ते १३  ऑक्टोबर दरम्यान हे प्रशिक्षण कार्यालयाने तारीखवार केलेल्या नियोजनानुसार देण्यात येईल. शिक्षकांना सदर प्रशिक्षण ऑनलाईन zoom app द्वारे देण्यात  येणार  आहे. सदर प्रशिक्षणात अगस्त्या इंटरनशनल फाउंडेशन,बेंगलोर यांनी निश्चित केलेल्या विषयानुसार सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत प्रशिक्षण होईल.          

             प्रशिक्षणाचे उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधनपरिषद पुणेचे संचालक एम देवेंद्र सिंह तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे उपस्थित राहून शुभेच्छा संदेश देणार आहेत तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र गिरी,शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर भगवान फुलारी,शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर श्रीम. तृप्ती अंधारे हे सर्व मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास जेष्ठ अधिव्याखाता डॉ.भागीरथी गिरी,डॉ. जगन्नाथ कापसे, श्री.विजयकुमार सायगुंडे, अधिव्याखाता डॉ. योगेश सुरवसे, डॉ राजेश गोरे, ईमाम मिर्झा, संतोष ठाकूर, मुकुंद दहीफळे, शरीफ शेख, हे उपस्थित राहणार आहेत.

 

                                                                        ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु