बारा लाखापेक्षा अधिकचे लातूर जिल्ह्यात लसीकरण
बारा लाखापेक्षा अधिकचे लातूर जिल्ह्यात लसीकरण
लातूर,दि.22(जिमाका):-जिल्ह्यातील आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील पदाधिकारी व
अधिकारी यांच्या सहकार्याने आज दिनांक 22 सप्टेंबर, 2021 रोजीपर्यंत 12 लाख 7 हजार
187 इतके कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्य विभगाने कळविली
आहे.
लातूर जिल्ह्यात 20 लाख 25 हजार 597 इतके कोविड 19 लसिकरणाचे
उद्दिष्ट साध्य केले आहे. प्रथम डोस 8 लाख
69 हजार 659 इतके लसीकरण करण्यात आले तर टक्केवारी 43 टक्के आहे. दुसरा डोस 3 लाख
37 हजार 528 इतके लसीकरण करण्यात आले तर टक्केवारी 17 टक्के आहे, असे एकूण 12 लाख
7 हजार 187 आजपर्यंत जिल्ह्यात लसीकरण झाले आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment