... अन जिल्हाधिकारी निघाले मांजरा काठच्या गावी...!!

 

... अन जिल्हाधिकारी निघाले मांजरा काठच्या गावी...!!


लातूर दि.26 ( जिमाका ):- लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठा पाऊस होतो आहे.. धरणातून मांजरा नदीत विसर्ग सुरु आहे. पुढचे दोन दिवस हवामान विभागाने दक्ष राहिला सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भर पावसात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी भाडगाव, रमजानपुर,उमरगा, शिवणी,भातखेडा,बोरी या मांजरा नदी काठच्या गावांना भेटी दिल्या. शिवाराची पाहणी करून तिथल्या नागरिकांशी चर्चा केली.

 


जिल्ह्यात आज पर्यंत 525 मिमी एवढा पाऊस झाला असून लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा ( धनेगाव) धरण भरले असून त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठच्या गावांना योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. या पाण्यामुळे ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी  विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तात्काळ द्यायच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या आहे. या कामी तालुका प्रशासनाने लक्ष घालण्याचे आदेशही त्यांनी दिले.


आज सकाळी हवामान विभागाने पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हा प्रशासनाचा आपत्ती विभाग पूर्ण सज्ज असून आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या दौऱ्यात सुनिल यादव ,उपविभागीय अधिकारी, राजेश जाधव, नायब तहसीलदार,श्रीमती आरडवाड तालुका कृषी अधिकारी, संजय घाडगे मंडळ अधिकारी, संबंधित गावचे तलाठी, सरपंच यावेळी उपस्थित होते.

  पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार प्रशासन काम करत असून वाहत्या नदी, नाले, ओढे  यात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु