महावेध प्रकल्पांतर्गत हवामान घटकांची माहिती उपलब्ध


 

महावेध प्रकल्पांतर्गत हवामान घटकांची माहिती उपलब्ध

    लातूर,दि.22,(जिमाका): राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणे व हवामान घटकांची आकडेवारी संकलित करणेसाठी मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि व महाराष्ट्र शासन यांचे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून महावेध प्रकल्प राबविणेत येत आहे. या प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत  उभारलेल्या २ हजार 108 केंद्रातून तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांच्या Real Time माहितीची नोंद होत आहे.

     या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविलेली केंद्र स्थापनेपासून आज पर्यंत ३६५ दिवसापुर्वीची कमाल व किमान तापमान, सकाळी ८.३० वा. व सायंकाळी ५.३० वा.ची सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा झोत व पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेध पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदरची माहिती http://services.mahavedh.com/mahavedh_portal/ या संकेत स्थळावर Historical data या मथळ्याखाली जिल्हा, तालुका, मंडळ व ३० दिवसांचा अपेक्षित कालावधी निवडून पाहता येईल असे मुख्य सांख्यिक,कृषि आयुक्तालय,पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                    ****

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु