‘’थोडेसे माय बापासाठी पण ’’ या उपक्रमांतर्गत जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार

 

 ‘’थोडेसे माय बापासाठी पण ’’ या उपक्रमांतर्गत

जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार

 

लातूर,दि.28 (जिमाका):-सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाकडून, ‘’थोडेसे माय बापासाठी पण’’ या उपक्रमाअंतर्गत आपले सर्वांचे कर्तव्‍य म्‍हणून जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकाचा उचित सन्‍मान करून त्‍यांची सामाजिक प्रतिमा उंचावण्‍यासाठी दिनांक ०१ ऑक्‍टोबंर २०२१ रोजी जिल्‍हाभरामध्‍ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

  शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.लातूर - जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकांना शाळेत बोलवून त्‍यांचा सत्‍कार करणे व विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे जिवना विषयक अनुभव अदान प्रदान करणे. शिक्षणाधिकारी (मा.) जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकांना शाळेत बोलवून त्‍यांचा सत्‍कार करणे व विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे जिवना विषयक अनुभव अदान प्रदान करणे. उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्‍याण) जि.प.लातूर - जिल्‍हयातील सर्व अंगणवाडीमध्‍ये जेष्‍ठ नागरीकांना बोलावून त्‍यांचा उचित सत्‍कार व सन्‍मान करणे. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये जेष्‍ठ नागरीकांना बोलावून त्‍यांच्‍या आरोग्‍याची तपासणी करणे. जिल्‍हा पशूसंवर्धन अधिकारी, जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ पशूपालक यांचा सत्‍कार करणे. जिल्‍हा कृषी विकास अधिकारी जि.प.लातूर- जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ शेतकरी यांचा सत्‍कार करणे. जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी कार्यालय जि.प.लातूर या कार्यालयाकडून सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्‍या जेष्‍ठ नागरिकांचा विेशेष सत्‍कार करण्‍यात येणार आहे.

          जिल्‍हा परिषद व तालूका स्‍तरावरील सर्व शासकिय विभागप्रमुखा मार्फत लातूर जिल्‍हयातील जेष्‍ठ नागरीकांचा सत्‍कार करण्‍यात येवून त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे जिल्‍हयातील सर्व जेष्‍ठ नागरीकांनी कार्यक्रमामध्‍ये आपली उपस्थिती नोंदवावी व याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष राहूलजी केंद्रे, समाजकल्‍याण सभापती रोहीदासजी वाघमारे, जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केलेले आहे.

 

                                                       ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु