लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा लातूर, दि. १७ (जिमाका) : लातूर येथील केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्र येथे 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती व उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व अधिकारी, जवान व प्रशिक्षणार्थी यांच्या मनात देशाप्रती अभिमान व समर्पणाची भावना दिसून आली. समारंभाचे प्रमुख पाहूणे केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक, प्राचार्य अमीरुल हसन अंसारी होते. यावळी इतर राजपत्रित अधिकारी, अधिनस्त अधिकार, जवान तसेच सुमारे 1 हजार 700 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण समारंभाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला आणि उपस्थित सर्व जवांनानी एकत्रितपणे राष्ट्रगान गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाची आठवण करुन देतो तसेच देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याची प्रेरणा देतो. सभारंभाच्या अंतर्गत देशभक्तीपर गीते व भाषणांच्या सादरीकरणाने वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. जवान आणि प्रशिक्षणार्थी यांच्या चेहऱ्यावर देशप्रेम व अभिमानाची चमक स्पष्टपणे दिसून येत होती. संपूर्ण परिसरता देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण अनुभवायला मिळाले. याच प्रसंगी सीआरपीएफ कँम्प लातूर येथे भव्य क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध संघामध्ये रोमांचक सामने झाले. खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य व संघभावनेने प्रदर्शन केले. प्रेक्षकांनीही उत्स्फुर्तपणे खेळाडूंचा उत्साह वाढविला स्पर्धेच्या शेवटी विजेता व उपविजेता संघाचा सत्कार करण्यात आला ., कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी देशसेवेत कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांच्या समर्पक व कर्तव्य निष्ठेसाठी धन्यवाद देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शौर्य , शिस्त आणि देशभक्तीच्या भावनेने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास