ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका): महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मुंबई कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एचआयव्ही, एड्स इन्टेसीफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, विविध तपासण्या व उपचाराकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व ग्रामीण रुग्णालय मुरुडच्यावतीने आज विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा , डॉ. आनंद कलमे यांच्या नेतृत्वाखाली विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकूचे बिपीनचंद्र बोर्ड, डॉ. सचिन गोबाडे, डॉ. संदिप पुरी, डॉ. आरती भारती, डॉ. संदिप मंत्रे, डॉ. अविनाश ठोंबरे, डॉ. वसिम सय्यद, डॉ. मोहसीन देशमुख तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी विविध आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी, आरोग्याशी संबंधित शासनाच्या विविध योजनाबाबत तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तद्नंतर शिबीरातील उपस्थित लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, उचार व अवशक्तनुसार संदर्भ सेवा देण्यात आल्या. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास