आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम लातूर, दि. 14 (जिमाका): दरवर्षीप्रमाणे 12 ऑगस्ट रोजी जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही, एड्स संदर्भात अधिक संवेदशिल असून त्यानिमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एड्ससंदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग सृजनशिल असल्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृजी निर्माण व्हावी. याकरिता आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त जिलहा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर , उपजिल्हा रुग्णालय निलंगा व महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी.फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा येथे नुकतीच (१२ ऑगस्ट, 2026) रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रॅली, रेड रन स्पर्धा व प्रश्न मंजूषा स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले होते. लातूर येथील जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे,डॉ. विश्वेश कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण रॅली, रेड रन स्पर्धा व प्रश्न मंजूषा स्पर्धा नियोजन करण्यात आले होते. स्पर्धाच्या व रॅली उद्घाटन प्रसंगी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, निलंगा येथील महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुटचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू बिपीनचंद्र बोर्डे, निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिनकर पाटील, आरआरसी समन्वयक डॉ. अमोल घोडके व डॉ. चंद्रकांत ठाकरे, डॉ. संजय दुधमल, प्रा. अविनाश मुदळकर, प्रा. विलास कारभारी, निलंगा येथील महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू बिपीनचंद्र बोर्डे यांनी केले. तर निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रेड रन स्पर्धा स्पर्धेमध्ये मुले गटातून प्रथम क्रमांक अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील बसवेश्वर शिवदार भुरे, द्वितीय क्रमांक महेश दत्ता देवकत्ते, तृतीय क्रमांक लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील गौरव गोविंद कांबळे . स्पर्धेमध्ये मुले गटातून प्रथम क्रमांक लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील वैभवी कृष्णा सुर्यवंशी, द्वितीय क्रमांक निलंगा महाराष्ट्र विद्यालयातील अंकीता रंजीत चावारंगे, तृतीय क्रमांक निलंगा येथील ल. विठ्ठलराव धुमाळ शुभांगी वसंत धाकडे . विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय रोख रक्कम 2 हजार 500 , 2 हजार रुपये, 1 हजार 500 रुपये , मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षीस देवून गौरविण्यात आले. प्रश्न मंजषा स्पर्धा प्रथम क्रमांक निंलगा येथील निलंगा महाराष्ट्र विद्यालयातील वेदांत लालासाहेब शेरे, द्वितीय क्रमांक हर्षाली बालाजी कोकणे, तृतीय क्रमांक निलंगा नवभारत विद्यालयातील प्रणवी सुनिल मुळे . विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय रोख रक्कम 2 हजार 500 , 2 हजार रुपये, 1 हजार 500 रुपये , मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षीस देवून गौरविण्यात आले. जनजागण रॅली जनजागरण रॅलीचा प्रारंभ महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट प्रांगण निलंगा येथून शुभारंभ होवून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परत महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट प्रांगण निलंगा येथे उपस्थित विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्सबाबत मार्गदर्शन करुन अल्पोहार देण्यात आला व रॅलीची सांगता करण्यात आली. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास