लातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य करा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत आवाहन लातूर , दि. 31 (जिमाका) : लातूर जिल्ह्याला शांततेची पूर्वापार परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही कायम राहावी, यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मराठा बांधवांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कृत्य कोणीही करू नये, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी रात्री झालेल्या मराठा समाज प्रतिनिधींची बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सकल मराठा समाजाने आजवर शांततेने आंदोलन केले असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने यापुढेही या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी. तसेच या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच...