“राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती” व “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती” अर्ज करण्याचे आवाहन

 

विशेष वृत्त                                                                   दि. 10 ऑक्टोबर 2023

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

 

§  30 नोव्हेंबरपर्यंत नुतणीकरण नोंदणी करण्याची मुदत

 

लातूर, दि. 10 (जिमाका) : सन२०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP २.० ) (www.scholarships.gov.in ) या संकेतस्थळावर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून स्वीकारण्यास सुरुवात झाली असून या विद्यार्थ्यांनी दोन्ही योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  नवीन व नुतणीकरण विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत अंतिम मुदत असल्याचे शिक्षण संचालनालयाचे (योजना) शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आवाहन केले आहे.

राज्यामध्ये पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता नववनीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि नववी , दहावी , अकरावी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधारनुसार करावी.

यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल.
तर केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फतराष्ट्रीय शिष्यवृत्ती (NSP) पोर्टलद्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता नववी आणि दहावी) लागू केली आहे. NSP २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1ऑक्टोबर2023 पासून सुरू झाली आहे.

या योजनचे तपशील या विभागाच्या वेबसाइटवर ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( www.scholarships.gov.in ) वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पोर्टल 30 नोव्हेंबर 2023 आहे.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS) साठी पात्रतेचे निकष :

पालकाचे उत्पन्न रु . ३,५०,००० / - पेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह ) शाळेतील विद्यार्थांना सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय , जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र/राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील , खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत . इयत्ता दहावीनंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता दहावीमध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट .) इयत्ता नववी मधून दहावीमध्ये गेलेले विद्यार्थी व अकरावीमधून बारावीमध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .


दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी  प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष :

अनुदानित शाळांतील इयत्ता नववी व दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ( CwDs ) प्रि - मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे. एकाच पालकांच्या दोनपेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग) पाल्यांनाही शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी  नियमित असावा. जर विद्यार्थ्याला एका पेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची (लाभदायी) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवुन रद्द करवून घ्यावी . मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान, किंवा अशा प्रकारची राज्य शासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.शिष्यवृत्तीधारक जर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रुपये २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे.



शिष्यवृत्ती रक्कम

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS) साठी वार्षिक १२ हजार रुपये, दिव्यांग विद्यार्थांसाठी  असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक ९ हजार ते १४ हजार ६०० रुपये.

           राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) वेळापत्रक  

ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरवात १ ऑक्टोबर २०२३ , ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ , शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२३ , जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२३ दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत online अर्ज भरावेत.
                                                                  ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा