मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती आज लातूरमध्ये · नागरिकांकडील दस्तावेज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था · सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार कागदपत्रे

 मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती आज लातूरमध्ये

·         नागरिकांकडील दस्तावेज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

·         सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार कागदपत्रे  

लातूर, दि. 25 (जिमाका) : मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती 26 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहे. नागरिकांना त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे समितीसमोर सादर करावायचे असल्यासहे पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कागदोपत्री पुरावे स्वीकारले जाणार असून त्यानंतर समिती सोमर ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसूली पुरावेनिजाम काळात झालेले करारनिजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन द्यावीतअसे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे. हे पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे (भ्रमणध्वनी क्र. 8805160570) आणि चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर (भ्रमणध्वनी क्र. 8830724157) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन भवन येथील कक्षात सकाळी 11 ते दुपारी पर्यंत सादर केले जाणारे कागदोपत्री पुरावे दुपारी ते 4  या वेळेत समितीसमोर सादर केले जाणार आहेत. तरी नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा