क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. 19 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता उदगीर येथील जुना गंज गोलाई येथे आयोजित जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ आयोजित जगदंबा देवी आरतीस उपस्थित राहतील. सांयकाळी 6.30 वाजता उदगीर नगर परिषद कार्यालयासमोर मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष शारदोत्सव-2023 निमित्त ऑल इंडिया मुशायरा कविसंमेलनास उपस्थित राहतील. सांयकाळी 7.30 वाजता उदगीर शहरातील दुधिया हनुमान शेजारी दुध डेअरी येथील राधासाई दांडीया महोत्सव-2023 च्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. सोयीनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment