लातूर शहरातील मित्रनगरमधील दुर्घटनेबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांना दुःख
लातूर शहरातील मित्रनगरमधील दुर्घटनेबद्दल
क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांना दुःख
· अशा दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने जनजागृती करण्याच्या सूचना
लातूर, दि. 26 (जिमाका) : शहरातील मित्रनगरमध्ये 26 ऑक्टोबर रोजी सकाळी तीन मजली इमारतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद व वेदनादायी असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.
यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने खबरदारी घ्यावी, तसेच लोकांमध्ये अशा आपत्तीबाबत जनजागृती कराव्यात, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांनी दिल्या आहेत.
******
Comments
Post a Comment