विशेष मतदार नोंदणी शिबिरात 223 दिव्‍यांग मतदारांची नोंदणी

 विशेष मतदार नोंदणी शिबिरात 223 दिव्‍यांग मतदारांची नोंदणी


लातूर
, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये 13 ऑक्टोबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरात 223 दिव्यांग मतदारांनी आपली नोंदणी केली. तसेच या दिवशी मतदार यादीतील 1 हजार 699 दिव्यांग मतदारांचे फ्लॅगिंग करण्यात आले.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत दिव्‍यांग व्‍यक्‍तीची मतदार यादीत नोंदणी करणेफ्लॅगिंग करण्‍याच्‍या सूचना आयोगाने दिलेल्‍या आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ऑक्‍टोंबर महिन्‍यातील प्रत्‍येक आठवड्यात विशेष मतदार नोंदणीचे आयोजन करण्‍यात येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्‍यांग मतदारांची नोंदणीसाठी शिबीर राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु