लोकसहभाग साध्य करण्यासाठी तृतीयपंथी , दिव्यांग महिला मतदार व नवमतदारांसाठी ऑक्टोबरमध्ये मासिक विशेष कँम्पचे आयोजन

 

‍लोकसहभाग साध्य करण्यासाठी तृतीयपंथी , दिव्यांग महिला मतदार व नवमतदारांसाठी

ऑक्टोबरमध्ये मासिक विशेष कँम्पचे आयोजन

 

लातूर, दि. 10 (जिमाका):- निवडणूक आयोगाचे पत्र दि. 25 सप्टेंबर, 2023 व मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई याचे पत्र दि. 26 सप्टेंबर, 2023 च्या शिफारशीनुसार सुधारित 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील व्यक्तींची नोंदणी करणे, महिला मतदार यांची नोंदणी करणे, तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करणे तसेच दिव्यांग व्यक्तिीची मतदार यादीत नोंदणी करणे / Flagging करण्‍याच्या सुचना आयोगाने दिलेल्या आहेत.

त्यानुसार जास्तीत जास्त लोकसहभाग साध्य करण्याकरीता मासिक विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येवून लातूर जिल्ह्यातील नियुक्त केलेले तालूकानिहाय संपर्क अधिकारी यांनी विशेष कॅम्पचे आयोजन व पाहणी करावी. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यातील प्रत्येक आठवड्यात पूढीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे यांनी निर्गमित केले.

दिनांक 6 ऑक्टोंबर, 2023  ऑक्टोंबरचा पहिला आठवडा तृतीयपंथी मतदार, दि. 13 ऑक्टोंबर, 2023 दुसरा आठवडा दिव्यांग मतदार, दि. 20 ऑक्टोंबर, 2023 तिसरा आठवडा महिला मतदार आणि                दि. 27 ऑक्टोंबर, 2023 चौथा आठवडा महिला व नवमतदारांसाठी कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी (जि.प.) लातूर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक / प्राथमिक) जिल्हा परिषद, लातूर, जिल्ह्यातील सर्व कॉलेजचे प्राचार्य यांचे उपरोक्त नमुद केलेप्रमाणे कॅम्प मध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असेही परिपत्रकात नमुद केले आहे.

                                                       ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु