लातूर येथे आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर येथे आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर,दि.31 (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोंबर, 2023 रोजी भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वतंत्र चळवळीने व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली. रेणापूरचे तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांच्यासह खेळाडू व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment