जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववी, अकरावी प्रवेश परीक्षेसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन · 10 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षेचे आयोजन

    जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववी, अकरावी

प्रवेश परीक्षेसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

·         10 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षेचे आयोजन

लातूर, दि. 27 (जिमाका) : येथील पी. एम. श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व आकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. हा प्रवेश शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी असून इयत्ता नववी व आकरावी वर्गाच्या लॅटरल एन्ट्री प्रवेशासाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रवेश परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असू नसदर प्रवेश प्रक्रियाची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये लातूर जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता आठवीत शिकत असणारे विदयार्थीच इयत्ता नववी प्रवेश चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील. प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2009 पूर्वी व 31 जुलै 2011 नंतर झालेला नसावा. ही अट सर्व राखीव गटासाठी सुध्दा लागू राहील.

इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विदयार्थीचा जन्म 1 जून 2007 पूर्वी व 31 जुलै 2009 नंतर झालेला नसावा. ही अट सर्व राखीव गटासाठी सुध्दा लागू राहील. सत्र 2023-24 दरम्यान लातूर जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले उमेदवार अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.  

ऑनलाइन प्रवेश अर्ज https://navodaya.gov.inया संकेतस्थळाव 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरता येतील. अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख  (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही . एच. खिल्लारे ( भ्रमणध्वनी क्र. 986056८८40) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे शिक्षणाधिकारी, तसेच नवादेय विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा