लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेसाठी व्हॉटसअप क्रमांक जाहीर
लातूर
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत
रस्ता
सुरक्षेसाठी व्हॉटसअप क्रमांक जाहीर
· वाहूतक
नियमांचे उल्लंघन, अपघाताची माहिती देण्याचे आवाहन
लातूर, दि. 18 (जिमाका) : रस्ता सुरक्षाअंतर्गत
अपघात टाळण्यासाठी लातूर प्रादेशिक परिवहन विभागाने 9699403776 हा व्हॉटसअप क्रमांक
जाहीर केला आहे. या व्हॉटसअप क्रमांकाचा वापर करुन नागरिकांनी वाहतूक नियमाचे
उल्लंघन करुन धोकादायकरित्या वाहन चालताना आढळल्यास, एखाद्या
ठिकाणी अपघात झाला अथवा अपघात होण्याची शक्यता असल्यास त्याबाबतची माहिती देण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
रस्तेविषयक रचना
अपघातास कारणीभूत ठरत असल्यास त्याची सविस्तर माहिती व्हॉटसअप क्रमांकावर
छायाचित्रासह पाठविल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेस
अवगत करता येईल व अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळू शकेल, असे
लातूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले
आहे.
******
Comments
Post a Comment