उद्योगमंत्री उदय सामंत आज जिल्ह्यात
उद्योगमंत्री उदय सामंत आज जिल्ह्यात
लातूर, दि. 12 (जिमाका) : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उद्योगमंत्री ना. सामंत यांचे 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व मोटारीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनमध्ये लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभाग आढावा बैठक होईल. सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा नियोजन भवनमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा करतील.
दुपारी 12 वाजता ना. सामंत हे जिल्हा न्यायालयाच्या बाजूला असलेल्या बचत भवन समोरील शिवसेना जिल्हा कार्यालयाला भेट देतील. दुपारी 12.30 वाजता एमआयडीसी येथील हॉटेल अरोमा येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 1 वाजता याच ठिकाणी शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी 2 ते 2.30 पर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता एमआयडीसी येथून लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment