डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशनची विभागस्तरीय कार्यशाळा उत्साहात
डॉ.
पंजाबराव देशमुख नैसर्गीक शेती मिशनची विभागस्तरीय
कार्यशाळा उत्साहात
लातूर, दि. 4 (जिमाका) : आत्मा योजना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गीक
शेती मिशन अंतर्गत विभागस्तरीय कार्यशाळा
3 ऑक्टोबर रोजी मांजरा येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन
राज्याचे आत्मा संचालक दशरथ
तांबाळे यांच्या
हस्ते झाले. कृषि विद्यापिठाच्या सेंद्रिय
शेती विभागाचे प्रमुख डॉ.
आंनद गोरे, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, अकोला डॉ. पंजाबराव
देशमुख नैसर्गीक शेती मिशनचे प्रकल्प संचालक संतोष अळसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
शिवसांब लाडके तसेच नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि आत्माचे प्रकल्प
संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ
मार्गदर्शक म्हणून शिवाजी कांबळे यांनी सेंद्रिय शेती निविष्ठा
निर्मीतीसाठी टेनड्रम थेअरी याबाबत मार्गदर्शन केले.रोमिफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.
प्रशांत नाईकवाडी यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण मानके व पद्धती
तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेवा निवृत्त वरिष्ठ संशोधन
सहाय्यक ए. एन. जाधव यांनी शेतबांधावरील प्रयोगशाळा, शेतातच अल्पखर्चात नैसर्गीक निविष्ठा निर्मीतीचे तंत्रज्ञान
या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये विभागातील सर्व आत्मा प्रकल्प
उपसंचालक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालूका
तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी सहभाग घेतला. विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी महेशकुमार
तिर्थकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
***
Comments
Post a Comment