उद्योग संचालनालयाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी लातूर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 उद्योग संचालनालयाच्या योजनांची माहिती देण्यासाठी

2 नोव्हेंबर रोजी लातूर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

लातूर, दि. 27 (जिमाका) : राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी, तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने लातूर येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी कळविले आहे.

एक दिवसीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ.आमंत्रित करण्यात येत आहे. कार्यशाळा 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9 पासून लातूर जिल्हा उद्योग समूह हॉल, एकमत भवनच्या पाठीमागे, एमआयडीसी, लातूर येथे होणार असून इच्छुकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहणायचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. हणबर यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा