सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणांसाठी सन 2023-2026 या कालावधीकरिता लेखा परिक्षक नामतालिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणांसाठी
सन 2023-2026 या कालावधीकरिता
लेखा परिक्षक नामतालिकेसाठी अर्ज
करण्याचे आवाहन
लातूर, दि. 19 (जिमाका) : सद्यस्थितीत सहकार
खात्याच्या लेखापरीक्षक नामिकेवर असलेल्या लेखा परीक्षकांनी तसेच नामिकेवर नव्याने
देवू इच्छिणाऱ्या लेखापरीक्षकांनी उक्त निर्धारित मुदतीत उपरोल्लेखीत वेबसाईटवर ऑनलाईन
अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.
महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम 1960 ये कलम 81 अन्वये सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, निबंधकांनी तयार
केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालिकेवरील लेखापरीक्षकांकडून करवून
घेण्याची तरतूद आहे.
सहकारी संस्थांच्या
लेखापरीक्षकांच्या नामिकेसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 व
आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (1) (फ) मधील तरतूदीनुसार सहकारी
संस्थाच्या लेखापरीक्षणासाठी सन 2023 2026 या कालावधीसाठी लेखापरीक्षक नामिका तयार
करण्यासाठी ww.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर
दिनांक 23 ऑक्टोबर 2023 ते 06 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्जासंदर्भात सविस्तर तपशील वेबसाईटवर सर्व जिल्हा उपनिबंधक, सर्व जिल्हा विशेष
लेखापरीक्षक आणि सर्व कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
*****
Comments
Post a Comment