जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 26 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24  अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबाचिकूसंत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.

राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणेनांग्या न भरणेखते व औषधांचा योग्य वापर न करणेझाडांना व्यवस्थित आकार न देणेझाडांची गर्दी होणे आदी बाबीमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे महत्वाचे असून त्यासाठी 2023-24 मध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबासंत्रामोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम 40 हजार रूपये प्रति हेक्टर ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम 20 हजार रूपये प्रति हेक्टर या प्रमाणे तसेच कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी अस्तित्वातील आंबा फळपिकाचे वय कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 50 वर्षेचिकू - कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 50 वर्षेसंत्रा- कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 25 वर्षे तर मोसंबी फळपिकाचे वय कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 25 वर्षे असे राहील. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा