क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. 12 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व मोटारीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनमध्ये लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभाग आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा नियोजन भवनमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा व राखीव. दुपारी 12.30 वाजता एमआयडीसी येथील हॉटेल अरोमा येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता याच ठिकाणी शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 2 ते 2.30 पर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता एमआयडीसी येथून लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment