क्षेत्रविस्तार कार्यक्रम फळे, फुले व मसाला पीक लागवड योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
क्षेत्रविस्तार कार्यक्रम फळे, फुले व मसाला पीक लागवड
योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 26 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळे,फुले, मसाला पीक लागवड हे घटक राबविण्यात येत आहेत. यामध्ये विदेशी फळे, फुले मसाला पीक लागवड या बाबींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.
फुले लागवड
फुले लागवड घटकांतर्गत दांड्याची फुले (गुलाब) घटकाची खर्च मर्यादा प्रति हेक्टर 1 लाख रुपये असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देय राहील. इतर शेतकऱ्यांना खर्चाच्या 25 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 25 हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देय राहील. कंदवर्गीय फुले (निशिगंथ, लिली) घटकासाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टर 1 लाख 50 हजार रुपये असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 60 हजार रुपये अनुदान देय राहील. इतर शेतकऱ्यांना खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रुपये प्रतिहेक्टर अनुदान देय राहील. सुटी फुले (झेंडू, अॅस्टर, शेवंती) घटकासाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टर 40 हजार रुपये असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 16 हजार रुपये अनुदान देय राहील. इतर शेतकऱ्यांना खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देय राहील.
मसाला पीक लागवड
मसाला पीक लागवड घटकांतर्गत (मिरची, हळद, आले) बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टरी 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 12 हजार रुपये अनुदान देय राहील. बहुवर्षीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टरी 50 हजार रुपये असून शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 20 हजार रुपये अनुदान देय राहील.
विदेशी फळपीक लागवड
विदेशी फळपीक लागवड घटकांतर्गत ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी लागवडीसाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टरी 4 लाख रुपये असून शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 1 लाख 60 हजार रुपये अनुदान देय राहील. स्टॉबेरी लागवडीसाठी खर्च मर्यादा प्रति हेक्टरी 2 लाख 80 हजार रुपये असून शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा प्रति हेक्टरी कमाल 1 लाख 12 हजार रुपये अनुदान देय राहील, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
******
Comments
Post a Comment