लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन

 





लातूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या महिला अभ्यांगत, तसेच महिला अधिकारी,कर्मचारी यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कक्षाची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली.

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, धाराशिवचे अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, लातूर शहर महानगपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, मुलांना व मातेला स्तनपान करण्यासाठी व आराम करण्यासाठी सोफा, पलंग, पेंटींग, सिलींग, मॅटींग, खेळणी, खुर्च्या, लहान डायनिंग टेबल इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिशय सुविधापूर्ण हिरकणी कक्ष तयार केल्याबद्दल उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे अभिनंदन केले.

दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेला उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेने सुरु केलेल्या दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली.  सह्याद्री देवराई, द संस्कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या बियाणे बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. या बियाणे बँकेत स्थानिक प्रजातीच्या 75 दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हा एक अनोखा उपक्रम आहे. या माध्यमातून दरवर्षी सहा लाख वृक्षांची निर्मिती करण्याचे नियोजन असल्यची माहिती नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांनी यावेळी दिली. दुर्मिळ वृक्ष बियाणे बँकेचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणारी वृक्ष लागवडीमध्ये अशा दुर्मिळ वृक्षांच्या लागवडीवर भर देण्यात यावा, असे श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा