जिल्हा परिषद सेस व विघयो योजनेतंर्गत ग्रामीण्र भागातील महिला, मुलींसाठी विविध प्रशिक्षण, लाभाचे होणार वितरण

 

जिल्हा परिषद सेस व विघयो योजनेतंर्गत ग्रामीण्र भागातील

महिला, मुलींसाठी विविध प्रशिक्षण, लाभाचे होणार वितरण

 

लातूर दि. 23 :  महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषदेतंर्गत सन 2023-2024 या वित्तीय वर्षात जिल्हा परिषद सेस योजना व विशेष घटक योजनेतंर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभ व व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण विषयक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

विशेष घटक योजनेतंर्गत ग्रामीण भागातील अनुसुचित जातीच्या महिलांना व मुलींना व्यावसायिक तांत्रिक टॅली प्रशिक्षणासाठी 90 टक्के रक्कम, तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या सातवी ते बारावी पास मुलींना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षणासाठी 90 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद सेस योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिनसाठी 90 टक्के रक्कम दिली जाईल. ग्रामीण भागातील महिलांना मिरची कांडप, पिठाची गिरणी, शेळी पालन, कुक्कुट पालन, मिनी किराणा दुकान विविध साहित्य वाटप करणे (यापैकी एका) बाबीसाठी 90 टक्के रक्कम, ग्रामीण भागातील सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी 90 टक्के रक्कम दिली जाईल.

विशेष घटक योजना व जिल्हा परिषद सेस योजनेतंर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींना वैयक्तिक लाभ व व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षण विषयक योजनेचे सर्व परिपूर्ण अर्ज शासन निर्णयाच्या अटी व शर्थीच्या अधिन राहून तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. तसेच पात्र लाभार्थ्यांची निवड महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा