मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीविषयक पुरावे संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा
नोंदीविषयक पुरावे
संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. 18 (जिमाका) : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक
व अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून तपासणी अंती पात्र
व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र
देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लातूर दौऱ्यावर येणार असून
समितीसमोर सादर करण्यासाठी नागरिकांकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा
नोंदींविषयक पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात सुरु करण्यात
आलेल्या एक खिडकी कक्षात या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सादर करण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने केले आहे.
समिती समोर सादर करण्यासाठी
निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी
दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी कागदपत्रांची
झेरॉक्स प्रत सादर करता येईल. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती जिल्हा दौऱ्यावर येईपर्यंत हे पुरावे संबंधित
तहसील कार्यालयातील एक खिडकी कक्षात स्वीकारले जातील, अशी
माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली.
*****
Comments
Post a Comment