‘महाज्योती’मार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब, सीम वाटप कार्यक्रमाचे 30 ऑक्टोबर रोजी आयोजन

 

‘महाज्योती’मार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना

मोफत टॅब, सीम वाटप कार्यक्रमाचे 30 ऑक्टोबर रोजी आयोजन

लातूर, दि. 18 (जिमाका) :  महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कार्यालयामार्फत विविध प्रकल्प, योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रकल्पातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व इंटरनेट महाज्योती पुरविण्यात येत आहे. याचे वितरण 30 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन सभागृह येथे होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील निवड झालेल्या आणि त्याबाबत महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत कळविलेल्या विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता टॅब व सीम वितरणाच्या कार्यक्रमास महाज्योती कार्यालयाकडून कळविलेल्या कागदपत्रासह उपस्थित राहून टॅब व सीम प्राप्त करून घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

******

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु