जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील भरती परीक्षेच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळास भेट द्यावी
जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील भरती
परीक्षेच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळास भेट द्यावी
लातूर, दि. 19 (जिमाका) : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे. विविध संवर्गाच्या पदाची परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत लातूर शहरातील 6 व निलंगा तालुक्यातील 1 अशा एकूण 7 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षार्थींनी परीक्षा संदर्भात वेळापत्रक, ऑनलाईन परीक्षासंदर्भात माहिती, नियम, अटी व शर्ती याबाबत माहितीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या https://zplatur.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्याआधी प्रवेशपत्रासोबत देण्यात आलेल्या सूचनांची प्रत डाऊनलोड करुन घ्यावी. परीक्षार्थींनी या सूचनांचे वाचन करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. जिल्हा परिषदेमार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सूचनांचे पालन करण्यात यावे. नवीन सूचनांसाठी परिक्षार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नियमितपणे पाहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment