कृषी विभागाच्या रब्बी हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीत विविध विषयांवर मंथन
कृषी विभागाच्या रब्बी हंगामपू
लातूर, दि. 12 (जिमाका) : कृषी विभागाची रब्बी हंगामपूर्व तयारी आढावा बैठक 11 ऑक्टोबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यामध्ये पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला चमुचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण, पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, सोयाबीन संशोधन केंद्र कसबे डिग्रस येथील शास्त्रज्ञ डॉ सचिन महाजन, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका शेंडगे, गळीतधान्य संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रशांत अंबिलवादे, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ के. डी. दहिफळे, मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथील किटकशास्त्रज्ञ संदीप देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. अरूण गुट्टे, कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, राजेंद्र काळे यावेळी उपस्थित होते.
सोयाबीन संशोधन केंद्र कसबे डिग्रस येथील शास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन यांनी सोयाबीन, हरभरा पिकाचे लागवड तंत्रज्ञान यात योग्य वाणांची निवड, बीजप्रक्रिया, खत व पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. अधिक उत्पादनासाठी वेळीच कीड रोग नियंत्रण आवश्यक आहे व उत्पादन वाढीसाठी वेळीच कीड रोग नियंत्रण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आहा
मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ संदीप देशमुख, डॉ. प्रशांत अंबिलवादे, डॉ. के. डी. दहिफळे, डॉ अरूण गुट्टे यांनीही याप्रसंगी तूर, रब्बी ज्वारी, हरभरा, मका, गहू, राजमा या पिकाचे उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान व कीड रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेची माहिती दिली व विविध योजनांचा तालूकानिहाय आढावा घेतला.
प्रास्ताविक कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व तालुका तंत्र व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment