ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ वाढविली
ग्रामपंचायत
सार्वत्रिक निवडणुकीसाठी
नामनिर्देशनपत्र
दाखल करण्याची वेळ वाढविली
लातूर, दि. 18 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने
3 ऑक्टोबर, 2023 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकीची समावेश आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे
नामनिर्देशन दाखल करण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. आता 18 ते 20 ऑक्टोबर 2023
या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
यापूर्वी जाहीर करण्यात
आलेल्या कार्यक्रमानुसार 16 ते 20 ऑक्टोबर,2023 या कालावधीत सकाळी
11 ते दुपारी 3 या वेळेत संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्याचा कार्यक्रम
ठरवून देण्यात आला होता. आता राज्य निवडणूक आयोगाच्या 17 ऑक्टोबर,
2023
रोजीच्या पत्रानुसार संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करतांना घोषणापत्राबाबत
येणाऱ्या अडचणी दूर करून संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 18 ते 20
ऑक्टोबर, 2023 या कालावधीमध्ये नामनिर्देशन दाखल
करण्याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती
सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली.
*****
Comments
Post a Comment