महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन स्वीकारण्यास मुदतवाढ

                                          महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी ते आठवीसाठी

नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन स्वीकारण्यास मुदतवाढ

 

लातूर, दि. 06 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी-फेब्रुवारी, 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास 15 ऑक्टोबर, 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

नांव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी 15 ऑक्टोबर, 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरावेत. 18 ऑक्टोबर, 2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहीत शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावेत. 23 ऑक्टोबर, 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावेत.

वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा