अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी

विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि.26 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी फुलपिक लागवडमशरुम उत्पादनहरीतगृहशेडनेट हाऊसप्लॅस्टिक मल्चिंगटॅक्टर 20 एचपीशेतकरी अभ्यास दौरासामुहिक शेततळेवैयक्तिक शेततळे अस्तरीकरणकांदाचाळपॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी बाबींसाठी 23 लाख रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे. या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login किंवा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक अथवा लॅपटॉपसामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून अर्ज करता येतील. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सातबाराआठ अबँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक पात्र  शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.व्ही.लाडके यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु