निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
लातूर ,दि.26 (जिमाका):-जिल्हा कोषागार कार्यालयातून
बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी व कुटुंब
निवृत्तीवेतनधारकांनी आपले हयात प्रमाणपत्र 1 नोव्हेंबर 2023 पासून बँकेमार्फत सादर करावे, असे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकारी संतोष धुमाळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत.
प्रत्येक निवृत्ती वेतनधारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यांसमोर स्वाक्षरी
करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. धुमाळे
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
Comments
Post a Comment