मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समितीच्या लातूर दौरा तारखेत बदल
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समितीच्या लातूर दौरा तारखेत बदल
· 26 ऑक्टोबर रोजी समितीचा लातूर दौरा होणार
· नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन
लातूर, दि. 19 (जिमाका) : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करीत आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही समिती 21 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येणार होती. आता समितीच्या दौऱ्या कार्यक्रमात बदल झाला असून ही समिती 26 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येणार आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment