व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
§ अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 17 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींचे 12असे एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सदर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने होत असून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 सप्टेंबर, 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि काही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अर्ज भरण्यासाठी http://www.hostel.mahasamajkalyan.inया लिंकचा वापर करुन 20 सप्टेंबर, 2023 व त्यानंतर केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज भरु शकतात.
तेंव्हा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी उपरोक्तप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी वरील लिंकचा वापर करुन तसेच स्थानिक गृहप्रमुख अथवा गृहपाल यांचेकडे संपर्क साधून 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस.एन.चिकुर्ते यांनी केले आहे.
Comments
Post a Comment