महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता जनजागृतीचा प्रचार आणि प्रसार करावा -- जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे
महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये
निवडणूक साक्षरता जनजागृतीचा प्रचार आणि प्रसार करावा
-- जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 09 (जिमाका) : महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता संदर्भात जनजागृती प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षर मंडळाची स्थापना करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या मंडळात व्हावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी आवाहन केले आहे.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे सी.ई.ओ. तेजस गुजराथी, महाराष्ट्र समन्वयक अल्ताफ पीरजादे तसेच वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे लातूर जिल्हा समन्वयक आकाश सोनकांबळे, विष्णू चव्हाण व वैष्णवी मोरे उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाकडून नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकविषयक जागरूकता निर्माण करणे, मतदार नोंदणी करणे, लोकशाहीमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढविणे लातूर जिल्हा निवडणूक कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
अवर सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे पत्र दि. १५ जून, २०२३ अन्वये दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिम सुरु आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय लातूर व वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक साक्षरता मंडळ लातूर जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
सदरील बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर व निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी, लातूर जिल्हा विविध महाविद्यालय, शाळा यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच त्यांचे प्रतिनिधी नोडल अधिकारी उपस्थितीत होते. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक गुगल मीटरद्वारेऑनलाईनही उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment