लातूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि 47 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
·
6 ऑक्टोबर रोजी
नोटीस होणार प्रसिद्ध
·
16 ते 20 ऑक्टोबर
दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
·
निवडणुका असलेल्या
ग्रामपंच्यातींमध्ये आचारसंहिता लागू
लातूर, दि. 03 (जिमाका) : जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि 47
ग्रामपंचायातींमधील 53 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक
आयोगाने जाहीर केला आहे. यासाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून निवडणूक
कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात
आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव
टाकणारी कोणतीही कृती अथवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक
स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना कुठेही करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, तसेच पोटनिवडणुकीची नोटीस 6 ऑक्टोबर 2023
रोजी संबंधित तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. 16 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023
या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार आहेत. या
नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 पासून सुरु होईल. 25
ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. याच दिवशी
दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह नेमून देवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या
उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता असल्यास 5 नोव्हेंबर 2023 रोजी
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान घेतले जाईल. निवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी घोषित
केला जाईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित
करतील. 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या
निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले
आहे.
सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 13 ग्रामपंचायती
लातूर तालुका- हरंगूळ बु., शामनगर.
जळकोट तालुका- ढोरसांगवी, रामपुर
तांडा, मंगरुळ.
चाकूर तालुका- शिवणी म.
औसा तालुका- येलोरीवाडी, आलमला, किल्लारी.
अहमदपूर तालुका- तीर्थ, उन्नी जांब.
देवणी तालुका- चवण हिप्परगा, नागतिर्थवाडी.
पोटनिवडणूक होत असलेल्या 47 ग्रामपंचायती
चाकूर
तालुका- बोळेगाव खु., हनुमंत जवळगा,
आनंदवाडी, नागदरवाडी, जगळपूर खु.
रेणापूर
तालुका- गव्हाण.
देवणी
तालुका- डोंगरेवाडी, वागदरी.
लातूर
तालुका- गाधवड, कासारखेडा, टाकळी शी.,
भातखेडा, रायवाडी, भातांगळी, भोईसमुद्रगा.
जळकोट तालुका- कुनकी, लाळी बु.,
उदगीर तालुका- लोहारा, इस्मालपूर, हंडरगुळी.
औसा तालुका- हासाळा, शिंदाळा लो., चलबुर्गा, गांजनखेडा, भंगेवाडी, हासेगाव.
शिरूर अनंतपाळ तालुका- शिवपूर, लक्कड जवळगा, गणेशवाडी, दैठणा, बेवनाळ, येरोळ.
अहमदपूर तालुका- खरबवाडी, गुंजोटी, परचंडा, धानोरा बु.
निलंगा तालुका- आनंदवाडी गौर, बामणी, सावरी, सिरसी हं., शेळगी, येळणूर, शिवणी
कोतल, चिंचोडी, तळीखेड, हलगरा, गुंजरगा.
*****
Comments
Post a Comment