Posts

Showing posts from January, 2024

इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध; शाळांनी प्रवेशपत्र प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन

  इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध; शाळांनी प्रवेशपत्र प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन   लातूर , दि. 31 (जिमाका): सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च- 2024 साठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगीन’मध्ये ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व माध्यमिक शाळांनी हे प्रवेशपत्र प्रिंट कडून विद्यार्थ्यांना द्यावीत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.   प्रवेशपत्र उघडताना काही त्रुटी (एरर) असल्यास हे प्रवेशपत्र गुगल क्रोममध्ये उघडावे. प्रवेशपत्र प्रिंट काढून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेवू नये. प्रवेशपत्र प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जावून करून घ्याव्यात. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची

दहावी, बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची हेल्पलाईन सुरु

  दहावी, बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची हेल्पलाईन सुरु   लातूर , दि. 31 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान होणारी इयत्ता बारावी परीक्षा आणि 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ही हेल्पलाईन कार्यान्वित राहील.   प्र. सहसचिव तथा सहायक सचिव ए. आर. कुंभार (भ्रमणध्वनी क्र. 9405 077991 ) यांची हेल्पलाईनसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. इयत्ता बारावी परीक्षेसाठी एन. एन. डुकरे (भ्रमणध्वनी क्र. 8379072565 ), एम. यु. डाळिंबे (भ्रमणध्वनी क्र. 9423777789 ), एस. जी. आरसूलवाड (भ्रमणध्वनी क्र. 7767825495 ) आणि इयत्ता दहावीसाठी ए. पी. चवरे (भ्रमणध्वनी क्र. 9421765683 ), एस. एल. राठोड (भ्रमणध्वनी क्र. 8830298158 ), ए. एल. सूर्यवंशी (भ्रमणध्वनी क्र. 7620166354 ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   लातूर जिल्ह्यास

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत बँक ऑफ बडोदामार्फत 60 पोषण आहार कीटचे वितरण

  प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत बँक ऑफ बडोदामार्फत 60 पोषण आहार कीटचे वितरण लातूर , दि.31 (जिमाका): जिल्ह्यात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना उपचार काळात पोषक आहार मिळावा, यासाठी स्वंयसेवी संस्था , सामाजिक संस्था , दानशूर व्यक्ती यांच्या सहभागाने पोषण आहार कीटचे वितरण करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बँक ऑफ बडोदाच्या सीएसआर निधीतून 26 जानेवारी 2024 रोजी 60 क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वितरण करण्यात आले.   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. एन. तांबारे यांना पोषण आहार कीट सुपूर्द केल्या. बँक ऑफ बडोदाचे बँक व्यवस्थापक एन. एम. पाटील आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.   आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजने अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपचारावर असणाऱ्या सर्व क्षयरुग्णाचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रुग्णांना अतिरिक्त मदत करण्याकरिता क्षयरुग्णांना प्

जिल्हा लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

  जिल्हा लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन लातूर , दि.31 (जिमाका): प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. *****

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 2 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे - डॉ. ओमप्रकाश जाधव

Image
  मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 2 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे -          डॉ. ओमप्रकाश जाधव ·         जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वेक्षण आणि जमीन धरणेबाबतचा आढावा ·         सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबाची नोंद होणे आवश्यक लातूर , दि. 31 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सुरु असलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी आज येथे दिल्या. मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि सन 1960 ते 2020 या कालावधीतील जमीन धारणेविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. जाधव बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिक

शेतीतील नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी

·         2 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन लातूर , दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, विकसित होत असलेले तंत्रज्ञान याबाबत माहिती घेण्यासाठी भारताबाहेरील देशातील शास्त्रज्ञ , शेतकरी याच्याशी प्रत्यक्ष भेटीची, तसेच संस्थांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी परदेशात अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाणार असून यासाठी शेतकऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2024 पर्यानात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्याचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जर्मनी , फ्रांस , स्पेन , स्वित्झरलँड , ऑस्ट्रीया , न्यूझीलँड , नेदरलँड , व्हिएतनाम , मलेशिया , थायलँड , पेरु , ब्राझील , चिली , ऑस्ट्रेलिया , सिंगापूर इत्यादी देशाची निवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम

राज्य कुटुंब कल्याण आरोग्य सेवा उपसंचालकांनी घेतला लातूर परिमंडळातील आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा

Image
          लातूर, दि. 29 (जिमाका) : लातूर परिमंडळातील जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लातूर , धाराशिव , बीड व नांदेड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक राज्य कुटुंब कल्याण कार्यालयातील उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या उपस्थितीत लातूर आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी त्यांनी परिमंडळातील आरोग्य विषयक सेवा आणि कामकाजाचा आढावा घेतला. लातूरच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अर्चना भोसले-किर्दक, सहायक संचालक डॉ. प्रीती बादाडे, सहायक संचालक डॉ. संजय ढगे, परिमंडळातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, आरसीएच, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यावेळी उपस्थित होते. श्रीमती डॉ. गायकवाड यांनी परिमंडळातील जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्राचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच जिल्हानिहाय आरोग्याच्या विविध कार्यक्रमाचा योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध अनुदान मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे निर्देश दिले. श्रीमती ड

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  ·         25 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार क्रीडा प्रकारांच्या यादीत सुधारणा लातूर , दि. 29 (जिमाका): शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहसी उपक्रम यासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत 29 डिसेंबर , 2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत पुणे येथील क्रीडा व युवक संचालनालय येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित नियमावलीनुसार पुरस्काराच्या पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीत इक्वेस्टरियन , गोल्फ , यॉटींग , पॉवरलिफ्टींग , बॉडीबिल्डींग , कॅरम , बिलीयर्डस अॅण्ड स्नुकर , सॉफ्टबॉल (पुरूष) व बेसबॉल (महिला) या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती   क्रीडा पुरस्कार 2

उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करणार - केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला

Image
·         उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्पाची पाहणी ·         ‘एनडीडीबी’चा अहवाल प्राप्त होताच पुढील निर्णय घेणार लातूर , दि. 29 (जिमाका): उदगीर येथील शासकीय दूध योजना प्रकल्प सुरु झाल्यास येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत होणार आहे. दूध उत्पादक शेतकरी, पशुपालकांचे हित लक्षात घेवून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज दिली. उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्पाच्या प्रांगणात आयोजित दूध व्यावसायिक, पशुपालक व शेतकरी संवाद कार्यक्रमात ना. रुपाला बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, दिलीप देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय हा आर्थिक उत्पन्नाचे चांगले साधन ठरेल. उदगीर शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून

लातूर येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
  सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे ·        शेती , आरोग्य , शिक्षण , उद्योग , पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य ·        जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर लातूर, दि. 2 6 ( जिमाका):   भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथे 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थितांना शुभेच्छा देताना ना. बनसोडे बोलत होते. सर्वप्रथम ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोम