शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन 

*लातूर, दि. 9 (जिमाका):* राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षातील या पुरस्कारासाठी 22 जानेवारी 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरसकार (दिव्यांग खेळाडू)  व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने 29 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची सुधारित नियमावली नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-2023 या वर्षाच्या पुरस्कारासाठी 22 जानेवारी, 2024 पर्यंत राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील स्क्रोलींग लिंकमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर 22 जानेवारी, 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. लकडे यांनी केले आहे. 

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु